संगमनेरातील कोरोनाबाधित वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; युवतीही कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:42 IST2020-06-14T13:39:51+5:302020-06-14T13:42:43+5:30
संगमनेर शहरातील मालदाड रस्ता परिसरात राहणा-या एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने शनिवारी (१४ जून) रात्री मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती.

संगमनेरातील कोरोनाबाधित वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने मृत्यू; युवतीही कोरोना पॉझिटिव्ह
संगमनेर : शहरातील मालदाड रस्ता परिसरात राहणा-या एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेचा हृदयविकाराने शनिवारी (१४ जून) रात्री मृत्यू झाला. या महिलेला कोरोनाची लागण झाली होती.
संगमनेर शहरातील इस्लामपूरा येथील २२ वर्षीय तरूणालाही कोरोनाची लागण झाली आहे. खासगी लॅबमध्ये या दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असता त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर रविवारी शहरातील मोगलपुरा येथील तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल अहमदनगर जिल्हा रूग्णालयाकडून प्राप्त झाला आहे, अशी माहिती संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिली.
संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या आता ८४ झाली आहे. दरम्यान, मुंबईहून संगमनेरात आलेल्या २४ वर्षीय युवतीला कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, ही युवती संगमनेर येथील नसून ती मुंबईहून थेट अहमदनगरला गेली आहे. तिचा संगमनेरशी कोणताही संपर्क नाही, असेही तहसीलदार निकम यांनी सांगितले. याबाबत तसे जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या वतीने कळविले आहे.