राहुरी तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:33 PM2018-05-08T16:33:13+5:302018-05-08T16:33:41+5:30
जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे
म्हैसगाव (ता.राहुरी): जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या राहुरी तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये म्हैसगाव, बारागाव नांदूर , ब्राह्मणी, देसवंडी, मोमीन आखाडा, घोरपडवाडी, दरडगाव थडी ,गंगापूर, तमनर आखाडा, धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक या गावांचा समावेश आहे.
या निवडणुकीमध्ये सरपंच पद जनतेतून निवडले जाणार आहे. त्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सर्वसाधारण प्रवगार्साठी म्हैसगाव , मोमीन आखाडा , देसवंडी. अनुसूचित जातीसाठी घोरपडवाडी ( महिला), बारागाव नांदूर (महिला) , दरडगाव थडी (खुले). नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तमनर आखाडा , गंगापूर, धामोरी बुद्रुक, ब्राह्मणी. अनुसूचित जमातीसाठी धामोरी खुर्द असे सरपंच पदासाठी आरक्षण असणार आहे. यामध्ये म्हैसगाव, मोमीन आखाडा, देसवंडी, घोरपडवाडी, धामोरी खुर्द व दरडगाव थडी ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी ९ सदस्य आहेत. बारागाव नांदूर व ब्राह्मणी ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी १७ सदस्य, तमनर आखाडा, धामोरी बुद्रुक व गंगापूर ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी ७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत.
उमेदवारांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू
उमेदवारी अर्ज भरण्यास ७ मे पासून सुरवात झाली असून १२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. १४ मे ला अर्ज छाननी तर १६ मे पर्यंत अर्ज मागे घेता येईल. २७ मे रोजी मतदान होऊन २८ मे रोजी निकाल घोषित केला जाईल. उमेदवारी अर्ज आॅनलाइन पध्दतीने भरावयाचे आहेत. त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून कागदपत्राची जुळवाजुळव सुरू आहे.