रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर बाबासाहेब भोस, तुकाराम कन्हेरकर यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:18 PM2020-06-28T12:18:49+5:302020-06-28T12:19:50+5:30
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौौन्सिल बॉडी सदस्यपदी बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची निवड झाली आहे.
श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौौन्सिल बॉडी सदस्यपदी बाबासाहेब भोस व महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांची निवड झाली आहे.
गेल्या वर्षी भाजपाचे नेते माजीमंत्री बबनराव पाचपुते यांना संधी दिली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बबनराव पाचपुते यांना ब्रेक दिला. त्यांच्या जागी बाबासाहेब भोस व दादाभाऊ कळमकर यांना संधी देण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील सेवकांमधून तुकाराम कन्हेरकर यांची वर्णी लागली आहे. या निवडीने श्रीगोंदा तालुक्यात दोघांना संधी मिळाली आहे. जनरल बॉडीचे जुने सदस्य कायम ठेवण्यात आले आहेत.