४४ गावांत निवडणुकांचा धुराळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:33 AM2020-12-14T04:33:52+5:302020-12-14T04:33:52+5:30
राहुरी तालुक्यात बाभूळगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहिरे, दवणगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, कनगर, करजगाव, कात्रड, केसापूर, ...
राहुरी तालुक्यात बाभूळगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहिरे, दवणगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, कनगर, करजगाव, कात्रड, केसापूर, खडांबे बु., कोळेवाडी, कोपरे, कुक्कडवेढे, लाख, पिंपळगाव, फुणगी, पिंपरी अवघड, राहुरी खु., रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदुळनेर, तिळापूर, उंबरे, वडनेर, वळण, वांबोरी, वांजुळपोई, वरशिंदे, वडनेर, वरवंडी, वावरत, बोधेगाव, धानोरे, गणेगाव, चांदेगाव, मल्हारवाडी, आंबी, आंबळनेर, कुरणवाडी, पाथरे, माहेगाव येथे निवडणूक होणार आहे, तर तांदुळवाडी गावातून वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने या दोन्ही ठिकाणी अद्याप प्रभाग रचना प्रभागनिहाय आरक्षण होणे बाकी असल्याने या दोन गावांची निवडणूक नंतर होणार आहे.
............
असा आहे कार्यक्रम
२३ ते ३१ डिसेंबर अर्ज दाखल करणे. ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. ४ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज माघारी घेता येतील. १५ जानेवारी रोजी मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
...........राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. तसेच तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्यात येणार आहे. तांदुळवाडी गावातून वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याने व अद्याप प्रभाग रचना व प्रभागनिहाय आरक्षण बाकी असल्याने त्या ठिकाणी नंतरच्या टप्प्यात निवडणूक होईल.
- एफ. आर. शेख, तहसीलदार, राहुरी.