महाविद्यालयांत ‘इलेक्शन फिवर’ : निवडणुका ७ सप्टेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 01:11 PM2019-08-03T13:11:10+5:302019-08-03T13:13:10+5:30

अखेर विद्यापीठाने महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

Election fever in colleges: Elections on September 7 | महाविद्यालयांत ‘इलेक्शन फिवर’ : निवडणुका ७ सप्टेंबरला

महाविद्यालयांत ‘इलेक्शन फिवर’ : निवडणुका ७ सप्टेंबरला

अहमदनगर : अखेर विद्यापीठाने महाविद्यालयांत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ७ सप्टेंबरला मतदान होणार असून, त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. त्यानंतर २४ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक होईल.
मागील काही वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या विद्यार्थी निवडणुका यंदा पुन्हा होणार आहेत. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी बुधवारी या निवडणुकांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, संस्था व विभागांमधील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांची अधिसूचना २१ आॅगस्टला प्रसिध्द केली जाणार आहे. दि. २९ आॅगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, ५ सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाईल. त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी सर्व महाविद्यालयांमध्ये मतदान होईल. संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य सलग ४ तासांची मतदानाची वेळ निश्चित करतील. मतदानानंतर महाविद्यालयातच मतमोजणी
करून लगेच निकाल घोषित केला जाईल.
महाविद्यालयांमधील निवडणुका झाल्यानंतर ९ सप्टेंबरला विद्यापीठ विद्यार्थी परिषदेची निवडणूक अधिसूचना प्रसिध्द केली जाईल. १४ व १५ सप्टेंबरला अर्ज दाखल करणे, १९ व २० सप्टेंबरला अर्ज माघारी घेणे, २४ सप्टेंबर मतदान, तर २७ सप्टेंबरला मतमोजणी व निकाल असा निवडणूक कार्यक्रम असेल.

महाविद्यालय निवडणूक वेळापत्रक
निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करणे - २१ आॅगस्ट
मागासवर्ग प्रतिनिधी ठरविण्यासाठी आरक्षण सोडत -  २३ आॅगस्ट
मतदार यादीवर लेखी आक्षेप नोंदवण - २६ आॅगस्ट
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे - २७ आॅगस्ट
उमेदवारी अर्ज दाखल करण - २९ आॅगस्ट
अर्ज छाननी करून वैध व अवैध अर्जांची यादी प्रसिध्द करणे - ३१ आॅगस्ट
अर्ज वैधतेबाबत आक्षेप सादर करणे - ३ सप्टेंबर
अंतिम अर्जाची यादी प्रसिद्ध करणे - ४ सप्टेंबर
अर्ज माघारी घेणे - ५ सप्टेंबर
मतदान, मतदानानंतर मतमोजणी व निकाल - ७ सप्टेंबर
उमेदवारांच्या खर्चाचा हिशोब सादर करणे - ९ ते २१ सप्टेंबर

Web Title: Election fever in colleges: Elections on September 7

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.