नवमतदार गांधींच्या पारड्यात

By Admin | Published: May 17, 2014 12:43 AM2014-05-17T00:43:53+5:302024-03-18T16:04:33+5:30

अहमदनगर मतदारसंघात मोदी लाटेने भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांना तारले. कमाल म्हणजे तरुण नवमतदाराने एकगठ्ठा त्यांच्या पारड्यात मत टाकले, असेच निकाल सुचवितो

In the election of the newcomer Gandhi | नवमतदार गांधींच्या पारड्यात

नवमतदार गांधींच्या पारड्यात

अहमदनगर मतदारसंघात मोदी लाटेने भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांना तारले. कमाल म्हणजे तरुण नवमतदाराने एकगठ्ठा त्यांच्या पारड्यात मत टाकले, असेच निकाल सुचवितो. गांधी तिसर्‍यांदा लोकसभेत पोहचले. या मतदारसंघात यशवंतराव गडाख यांच्यानंतर अशी कामगिरी करणारे गांधी हे दुसरे खासदार! मतदारसंघ खुला असल्याने उमेदवारीवरुन प्रचंड साठमारी झाली. राष्टÑवादीत तर तीव्र स्पर्धा. त्यातूनच कुरघोड्या वाढल्या. काही महिन्यांपूर्वी परिस्थिती अशी होती की, राष्टÑवादीचे तिकीट म्हणजे अर्धी लढाई जिंकली. त्यामुळे या स्पर्धेला धारही तशीच जोरदार. त्यामुळे उमेदवारीचा फैैसला राष्टÑवादीला अनेकदा पुढे ढकलावा लागला. अखेर राजळेंनी बाजी मारली. भाजपातही अशीच स्थिती होती. दिलीप गांधींना पुन्हा संधी नको, म्हणून पक्षातीलच एक गट कमालीचा सक्रिय होता. अशाही परिस्थितीत तिकीट मिळविण्याची किमया गांधींनी पुन्हा साधली. त्यावरुनही गजहब झाला. मात्र मोदी लाटेची जाणीव होताच, हा विरोध हळूहळू निवळत राहीला. प्रचारात राष्टÑवादीने जोरदार आघाडी घेतली होती. राष्टÑवादीच्या याच प्रचार धडाक्यात एकवेळ दिलीप गांधी झाकोळले गेल्यासारखे चित्र निर्माण झाले. मात्र अखेरच्या टप्प्यात एकीकडे आघाडीतील कुरबुरी वाढत राहील्या, तर दुसरीकडे भाजपा मोदींच्या निमित्ताने एकजूट होत गेली. मोदींच्या सभेनंतर तर वातावरणच बदलले.

Web Title: In the election of the newcomer Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.