संपली निवडणूक...चला कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:18 AM2021-01-17T04:18:06+5:302021-01-17T04:18:06+5:30

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा मागील पंधरा दिवसांपासून उडत होता. सर्वसामान्य नागरिकांच्या घरी दोन्हीही पार्टींचा उमेदवारांनी ये-जा ...

Election over ... let's get to work | संपली निवडणूक...चला कामाला

संपली निवडणूक...चला कामाला

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा धुरळा मागील पंधरा दिवसांपासून उडत होता. सर्वसामान्य नागरिकांच्या घरी दोन्हीही पार्टींचा उमेदवारांनी ये-जा होत असल्यामुळे शेतमजुरांसह शेतमालकालादेखील आपल्या शेतीच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी उसंत मिळत नव्हती. तरीदेखील बऱ्याच शेतमजूर महिलांनी आपला रोजगार बुडवू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतदान करून आपापल्या कामावर हजर झाल्या. मतदान होण्यापूर्वी सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी भरपूर आश्वासने दिली. तरीदेखील पोटासाठी स्वतःच कष्ट करावे लागतात याची जाणीव असलेले सर्वच शेतमजूर महिला व पुरुष शनिवारी सकाळपासूनच आपापल्या कामावर हजर झाले.

.....

आमच्याकडे कांदा लागवडीसाठी गावातीलच महिला शेतमजूर आहेत. मतदानाच्या दिवशी सकाळी लवकर मतदान करून कांदा लागवडीसाठी हजर झाल्या.

-परसराम लहारे, शेतकरी.

.....

निवडणुकीच्या दिवशीदेखील सकाळी आम्ही मतदान करून कामावर हजर झालो. मतदान करणे हे पवित्र काम आहे. त्यामुळे आम्ही सर्व महिलांनी मतदान केले.

-सुनीता वाघ, शेतमजूर महिला.

....

फोटो - १९ पिंपळगाव मजूर

....

ओळी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे निवडणूक संपल्याने शेतमजूर पुन्हा कामाला लागले आहेत.

Web Title: Election over ... let's get to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.