मनपाच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला; १ आॅक्टोबरला विशेष सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 04:58 PM2020-09-26T16:58:06+5:302020-09-26T16:58:33+5:30
स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या १ आॅक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅनलाईन पध्दतीनेच ही सभा होणार आहे.
अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या १ आॅक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आॅनलाईन पध्दतीनेच ही सभा होणार आहे.
मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा काढण्यात आली आहे.
स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना २, राष्ट्रवादी २ व भाजपचा १ सदस्य असे ५ सदस्य निवडले जाणार आहेत.