वृद्धेश्वर साखर कारखान्याची १२ फेब्रुवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:03 AM2021-01-08T05:03:48+5:302021-01-08T05:03:48+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. कारखान्यात संचालक निवडीसाठी ...

Election of Vriddheshwar Sugar Factory on 12th February | वृद्धेश्वर साखर कारखान्याची १२ फेब्रुवारीला निवडणूक

वृद्धेश्वर साखर कारखान्याची १२ फेब्रुवारीला निवडणूक

तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. कारखान्यात संचालक निवडीसाठी १२ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. १३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणून वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते. कोरोना संसर्गामुळे सुरू असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून पाथर्डी-शेवगावचे प्रांताधिकारी देवदत्त केकाण हे काम पाहणार असून त्यांना सहाय्यक म्हणून पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर यांची नियक्ती केली आहे.

वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी दि. ७ ते १३ जानेवारी या काळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १४ जानेवारीला अर्जांची छाननी होईल. १५ जानेवारीला वैध अर्जांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात माघारीची मुदत असून २ फेब्रुवारीला अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. गरज भासल्यास १२ फेब्रुवारीला मतदान होणार असून १३ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली.

Web Title: Election of Vriddheshwar Sugar Factory on 12th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.