श्रीगोंद्यातील सर्वाधिक विकास सोसायटींच्या निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:25 AM2021-09-15T04:25:55+5:302021-09-15T04:25:55+5:30
अहमदनगर : कोरोनाची लाट ओसरल्याने राज्य सहकारी प्राधिकरणाने विकास संस्थांच्या निवडणुकांची स्थगिती उठविली असून, श्रीगोंदा तालुक्यातील सर्वाधिक १४ विविध ...
अहमदनगर : कोरोनाची लाट ओसरल्याने राज्य सहकारी प्राधिकरणाने विकास संस्थांच्या निवडणुकांची स्थगिती उठविली असून, श्रीगोंदा तालुक्यातील सर्वाधिक १४ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विकास संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांना मुदतवाढ मिळाली होती. कोरोनाची लाट ओसरल्याने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने विकास संस्थांच्या निवडणुकांना दिलेली स्थगिती नुकतीच उठविली तसा आदेश जिल्हा उपनिबंधक कार्यालयास प्राप्त झाला आहे. या कार्यालयाकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यांत ४८ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुकीचा कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. या संस्थांच्या निवडणुका नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या टप्प्यापासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
...
पहिल्या टप्प्यातील निवडणुका
नगर- २, संगमनेर-८, राहाता- ५, राहुरी-३, नेवासा- ३, शेवगाव- ७, जामखेड-१, श्रीगोंदा-१४, पारनेर-५