पाचशेवर अर्ज आल्यास बॅलेटवर निवडणुका? मराठा समाजाचा पाचशे उमेदवार देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 12:32 PM2024-03-04T12:32:18+5:302024-03-04T12:32:59+5:30

प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत  निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधिकारी सांगत आहेत. 

Elections on the ballot if there are five hundred applications? The decision of the Maratha community to give five hundred candidates | पाचशेवर अर्ज आल्यास बॅलेटवर निवडणुका? मराठा समाजाचा पाचशे उमेदवार देण्याचा निर्णय

पाचशेवर अर्ज आल्यास बॅलेटवर निवडणुका? मराठा समाजाचा पाचशे उमेदवार देण्याचा निर्णय

अहमदनगर : विरोधी पक्षांकडून आधीच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी होत असताना आता राज्यात सकल मराठा समाज लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावातून दोन उमेदवार देणार आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत  निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधिकारी सांगत आहेत. 

तज्ज्ञांच्या मते या समस्या असतील
-  मोठ्या प्रमाणात ईव्हीएम उपलब्ध करणे कठीण 
-  बुथनिहाय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वाढत्या कर्मचारी संख्याबळाची समस्या
-  एवढी मोठी मतदार यादी ‘ईव्हीएम’वर असेल तर मतदार संभ्रमित होऊ शकतो.
-  राजकीय पक्षांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो. 

ईव्हीएम मशीनवर ३८४ उमेदवारांसाठी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यापेक्षा जास्त उमेदवार असतील तर ईव्हीएमला मर्यादा आहेत. लोकसभा निवडणुकीत पाचशे उमेदवार असतील तर त्याबाबत वरिष्ठांकडून जे निर्देश येतील त्यानुसार कार्यवाही होईल.
- राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, अहमदनगर
 

Web Title: Elections on the ballot if there are five hundred applications? The decision of the Maratha community to give five hundred candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.