सहा जिल्ह्यांमधील निवडणुका पुढे ढकलाव्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:27 AM2021-09-16T04:27:08+5:302021-09-16T04:27:08+5:30
ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, सरचिटणीस भारत गवळी, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम ...
ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, सरचिटणीस भारत गवळी, संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ॲड. श्रीराम गणफुले, ज्येष्ठ नेते राम जाजू, नगरसेविका मेघा भगत, दिनेश सोमाणी, अमोल रणाते, शैलेश फटांगरे, कोंडाजी कडनर, प्रशांत वाडेकर, संपत गलांडे, संतोष पठाडे, संजय नाकील, सतीश कानवडे, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, शिवकुमार भंगिरे, राजेंद्र सांगळे, सुधाकर गुंजाळ, माधव थोरात, वैभव लांडगे, कल्पेश पोगूल, सीताराम मोहरिकर, हरीश वलवे, माधव थोरात, प्रमोद ढवळे, बालाजी लालपोतू, दादासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, पालघर आणि नागपूर या जिल्ह्यांतील निवडणुका महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जाहीर झाल्या आहेत. या सरकारने न्यायालयाला वेळीच इम्पिरिकल डेटा दिला असता तर ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार होण्याची वेळ आली नसती. महाविकास आघाडी सरकारला ओबीसीचे राजकीय आरक्षण जाणूनबुजून काढून घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी न्यायालयाला डेटा दिला नाही आणि ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आले. जोपर्यंत राज्यात ओबीसीचे राजकीय आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.