प्रभाग क्रमांक-क ची मतदारयादी आज प्रसिध्द होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:22 AM2021-02-16T04:22:22+5:302021-02-16T04:22:22+5:30
अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक -९ क मध्ये पोटनिवडणूक होत असून, निवडणूकीसाठीची प्रारुप मतदायादी मंगळवारी प्रसिध्द केली जाणार आहे. ...
अहमदनगर : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक -९ क मध्ये पोटनिवडणूक होत असून, निवडणूकीसाठीची प्रारुप मतदायादी मंगळवारी प्रसिध्द केली जाणार आहे. मतदारयादीवर हारकती नोंदविण्यासाठी अंतिम मुदत २० फेब्रुवारी आहे.
महापालिकेचा नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक -९ क मध्ये पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणूकीसाठीची मतदारयादी प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी या प्रभागात १७ हजार मतदार होते. त्यात नव्याने समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे मतदारांची संख्या आणखी वाढणार आहे. महापालिका प्रशासनाने मतदरांची प्रारुप मतदारयादी तयार केली आहे. ही मतदारयादी महापालिकेच्या शहरातील सावेडी, शहर, केडगाव, नागापूर, बुरुडगाव आणि झेंडीगेट प्रभाग कार्यालयांत प्रसिध्द केली जाणार आहे. त्यावर हारकती मागविण्यात येतील. हारकतींवर सुनावणी घेऊन मतदारयादी अंतिम केली जाणार आहे.
....
इच्छुकांची तयारी सुरू
प्रभाग क्रमांक-९ कमधून पोटनिवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अरिफ शेख, अनिल शेकटकर यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तसेच पुढील महापौर पद अनूसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. राष्ट्रवादी व भाजपकडे महापौर पदासाठी उमेदवार नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून अनूसूचित जाती प्रभागातील महिलांना या प्रभागातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.