ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा

By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:10+5:302020-12-05T04:34:10+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीमध्ये मागील आठवड्यापासून विजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील ...

Electricity in rural areas | ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा

ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीमध्ये मागील आठवड्यापासून विजेचा पूर्णपणे खेळखंडोबा झाला आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शेतकरी, ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी, मोबाइल टॉवर या सर्वांवर झाला असून, याबाबत महावितरण अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. नगर तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याने थैमान घातले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे; परंतु दिवसादेखील महावितरणकडून वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील ऑनलाइन अभ्यास करणारे विद्यार्थी, छोटे-मोठे व्यावसायिक, सामान्य जनतेला संपर्क करण्यात अडचण निर्माण होत आहे. याबाबत महावितरणकडे संपर्क केला असता त्यांच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

Web Title: Electricity in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.