अकरा महिन्यांच्या बाळाने केली कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:03+5:302021-05-20T04:22:03+5:30

कोपरगाव शहरात एका कुटुंबातील चारही व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या होत्या. यामध्ये पती, पत्नी, पंधरा वर्षांचा एक मुलगा व एका अकरा ...

Eleven-month-old baby overcomes Kelly Corona | अकरा महिन्यांच्या बाळाने केली कोरोनावर मात

अकरा महिन्यांच्या बाळाने केली कोरोनावर मात

कोपरगाव शहरात एका कुटुंबातील चारही व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या होत्या. यामध्ये पती, पत्नी, पंधरा वर्षांचा एक मुलगा व एका अकरा महिन्यांच्या बाळाचादेखील समावेश होता. मागील आठवड्यात हे पूर्ण कुटुंब साईबाबा तपोभूमी येथे आमदार आशुतोष काळे यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले. मात्र अकरा महिन्यांचे बाळ असलेल्या त्या मातेला ऑक्सिजनची गरज असल्यामुळे माता आपल्या बाळासह एसएसजीएम महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू करण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होती. मागील आठ दिवस डॉ. कृष्णा फुलसौंदर, डॉ. वैशाली बडदे, डॉ. आसिफा पठाण, डॉ. वरद गर्जे, डॉ. कुणाल घायतडकर, डॉ. दीपक पगारे यांनी यशस्वी उपचार करून बाळाला व आईला कोरोनामुक्त केले.

..............

संपूर्ण कुटुंब कोरोनाबाधित असल्याचे समजताच धक्का बसला. कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी आम्ही दाखल झालो. मी पूर्णपणे बरीदेखील झाले. आज मी, माझे बाळ व माझे कुटुंब पूर्णपणे बरे होऊन घरी जात आहोत.

- बाळाची आई

...............

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून वैद्यकीय सेवा करीत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा घट्ट बसल्यामुळे साहजिकच ताण वाढला होता. मात्र आज अकरा महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार करून हे बाळ कोरोनामुक्त होऊन आपल्या आईच्या कुशीत हसताना पाहून सगळा ताण निघून गेला.

- डॉ. वैशाली बडदे

......

१९ कोपरगाव

कोरोनामुक्त झालेले ११ महिन्यांचे बाळ आपल्या आईसमवेत.

Web Title: Eleven-month-old baby overcomes Kelly Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.