शासकीय वाळू विक्रीतील त्रुटी दूर करू; महसूलमंत्री विखे-पाटील यांची माहिती
By शिवाजी पवार | Published: December 5, 2023 02:45 PM2023-12-05T14:45:22+5:302023-12-05T14:45:46+5:30
श्रीरामपूरमध्ये वाळू डेपोचे उद्घाटन
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : राज्य सरकारने ६०० रुपयांत वाळू विक्रीचे धोरण अवलंबिले आहे. या धोरणात काही प्रमाणावर त्रुटी असल्या तरी त्या निश्चित दूर होतील, अशी ग्वाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे व वांगी येथे शासकीय वाळू डेपो केंद्राचे उद्घाटन ऑनलाईन पध्दतीने विखे पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. त्याप्रसंगी विखे पाटील यांनी जनतेशी संवाद साधला.
दोन्ही केंद्रावरून एक लाख ८० हजार ब्रास वाळूची शासकीय डेपोतून विक्री होणार आहे. त्यामुळे चोरटी वाळू वाहतूकीला निश्चित आळा बसणार आहे. सध्या आठ शासकीय वाळू डेपो केंद्रातून लाभार्थीना स्वतातून वाळू मिळणार आहे, असे महसूल प्रशासनाने यावेळी सांगितले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नानासाहेब शिंदे तलसीलदार मिलींद वाघ, माजी जि. प. सदस्य शरद नवले, ग्रामपंचायत सदस्यअनिल थोरात, भाजपचे ओबीसी सेलचे प्रकाश चित्ते, कैलास शिंदे, आण्णा थोरात, उपसभापती अभिषेक खंडागळे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना शासकीय डेपोतून वाळू देण्यात आली. यावेळी तलाठी इलियास इमानदार, हिमालय डमाळे, ग्रामसेवक समीर मणियार, रमेश निबे, सरपंच रिजवाना शेख, उक्कलगावच्या सरपंच रविना शिंदे उपस्थित होते.