नगरमध्ये रस्त्यांच्या कामात अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार 

By अरुण वाघमोडे | Published: November 28, 2023 05:18 PM2023-11-28T17:18:32+5:302023-11-28T17:19:33+5:30

काळे म्हणाले जकीय वरदहस्तातून महापालिकेचे तत्कालीन अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा अपहार झालेला आहे.

Embezzlement in road works in city: Complaint to Anti-Corruption Department | नगरमध्ये रस्त्यांच्या कामात अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार 

नगरमध्ये रस्त्यांच्या कामात अपहार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार 

अहमदनगर: नगर शहरात सन २०१६ ते २०२० या दरम्यान शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे बनावट गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट व थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करून रस्त्यांच्या कामांत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाईन तक्रार केली असल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मंगळवारी येथे पत्रकारपरिषदेत सांगितले. 

काळे म्हणाले जकीय वरदहस्तातून महापालिकेचे तत्कालीन अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने हा अपहार झालेला आहे. या संदर्भातील सर्व पुराव्यांचे आपण एकत्र केले असून दोषींवर कारवाईसाठी आता कायदेशीर लढाई लढणार आहे. या अपहारात मनपाच्या बांधकाम विभागातील तत्कालीन अभियंता, बांधकाम विभागाचा पदभार असलेले  सर्व उपायुक्त, बांधकाम, लेखा विभागातील कर्मचारी, ठेकेदार, त्यांच्या संस्थांचे प्रोप्रायटर, भागीदार, ऑडिटर, शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर तसेच ज्या शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल देणारे कर्मचारी दोषी आहेत. या सर्व दोषींवर सामूहिक संगनमत करत कट कारस्थान रचून रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करून शासन व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीसमवेत अपहारासंदर्भात माहिती अधिकारातून मिळालेले सर्व कागदपत्र सादर केले असल्याचे काळे यांनी सांगितले. दरम्यान, १ डिसेंबर रोजी अँटी करप्शनचे अप्पर पोलीस महासंचालक नांगरे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेणार असून याबाबत जलद गतीने सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

अवालातून सत्य आले समोर 

दरम्यान बनावट टेस्ट रिपोर्टप्रकरणी शासकीय तंत्रनिकेतनसमोर केलेल्या आंदोलनानंतर तेथील प्राचार्यांनी १६ जूनला आदेश काढत २०१६ ते २०२० कालावधीतील अहवालांची सत्यासत्यता पडताळणीकरणे कामी पाच जणांची चौकशी समिती गठित केली होती. समितीने अहवाल सादर केला आहे. सदरहू चौकशी अहवालामध्ये अहमदनगर मनपाकडून प्राप्त ८७९ चाचणी अहवाल व त्रस्त चाचणी अहवालांपैकी ७२५ चाचणी व ५१ त्रयस्थ परीक्षण अहवाल असे एकूण ७७६ अहवाल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतून देण्यातच आलेले नसल्याची धक्कादायक बाब पूराव्यानिशी निष्पन्न झाली असल्याचे काळे यांनी सांगिले.

Web Title: Embezzlement in road works in city: Complaint to Anti-Corruption Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.