मोदींच्या सभेत भावूक, अनेकांना दिलीप गांधींच्या 'त्या' भाषणाची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:08 AM2021-03-17T08:08:31+5:302021-03-17T08:28:12+5:30

डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते.

Emotional before Modi's rally, many remember Dilip Gandhi's 'that' speech in ahmednagar | मोदींच्या सभेत भावूक, अनेकांना दिलीप गांधींच्या 'त्या' भाषणाची आठवण

मोदींच्या सभेत भावूक, अनेकांना दिलीप गांधींच्या 'त्या' भाषणाची आठवण

ठळक मुद्देडॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते.

अहमदनगर - भाजपा नेते माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज पहाटे दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यामुळे, अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांना धक्का बसला असून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. गत लोकसभा निवडणुकांवेळी भाजपाने दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारुन डॉ. सुजय विखे यांना तिकीट दिलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठपणाने पक्षाचं काम केलं. सुजय विखेंच्या विजयासाठी मोलाचे प्रयत्न केले होते. दरम्यान, याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेदरम्यान बोलताना ते भावूक झाले होते. .  

डॉ. सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचं अहमदनगर जिल्ह्यात आयोजन करण्यात आलं होत. त्यावेळी, व्यासपीठावर बोलताना त्यांना थांबण्यास सांगितल्याने ते चांगलेच चिडले होते. नरेंद्र मोदी सभेस्थळी पोहोचण्यापुर्वी काही क्षण अगोदर ही घटना घडली. मात्र, उमेदवार डॉ. सुजय विखेंनी सर तुम्ही बोला अशी विनंती केल्यानंतर गांधी पुन्हा बोलायला लागले. पण, बोलताना त्यांचा कंट दाटला होता. मनस्वी आलेला राग गिळताना दिलीप गांधींच्या डोळे पाणावल्याचे कॅमेऱ्यात टिपले गेले. भावुक झालेल्या दिलीप गांधींची नाराजी या निमित्ताने पुन्हा एकदा नगरमध्ये चर्चेचा विषय बनली होती.    

अन...खासदार दिलीप गांधी भडकले

दिलीप गांधी यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी भाषण थांबविण्यास सांगितले. त्यामुळे ते भडकले. गांधी म्हणाले, दोन मिनिटात, मी 10 मिनिटे बोलतो. नाहीतर मला बोलायचं नाही, असे म्हणत ते सभेतून निघून जात होते. त्यावेळी डॉ. सुजय विखे यांनी सर तुम्ही बोला, म्हणत गांधींना भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली. त्यानंतर भाषणात दिलीप गांधी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड उपस्थित होते.

दिलीप गांधी हे संघाच्या मुशीत वाढले होते, त्यामुळे भारतीय जनता पक्षावर त्यांची प्रामाणिक निष्ठा आणि प्रेम होते. त्यामुळेच, तीनवेळा खासदार एकवेळा केंद्रीयमंत्री पद मिळविल्यानंतरही पक्षाने 2019 च्या निवडणुकीत त्यांचं तिकीट कापलं. मात्र, तरीही त्यांनी एकनिष्ठ कार्यकर्ता बनून भाजपाचं काम केलं. डॉ. सुजय विखेंच्या विजयासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.  
 

Web Title: Emotional before Modi's rally, many remember Dilip Gandhi's 'that' speech in ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.