कर्मचारी संप : जिल्हा परिषदेमध्ये १०० टक्के प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:24 PM2018-08-07T15:24:42+5:302018-08-07T15:24:49+5:30
कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.
अहमदनगर : कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्याने राज्यभर संप पुकारण्यात आला असून अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचा-यांनी संपात १०० टक्के प्रतिसाद दिला आहे.
जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या महत्वाच्या मागण्या शासन स्तरावर प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे. यावर अनेकवेळाशासन दरबारी बैठका झाल्या, चर्चा झाल्या, यावर शासनस्तरावर सकारात्मक चर्चा होते परंतू आवश्यक तो शासन निर्णय काढलाजात नाही. शासन कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत वेळकाढूपणाचे धोरण राबवत आहे.
याबाबत कर्मचा-यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. म्हणूनच सर्व सघटनांशी चर्चा करून शासनाचे प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आजचा एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे. आजच्या संपात प्रामुख्याने वेतनत्रुटी दूर करून ७ वा वेतना आयोग तातडीने लागू करणे. केंद्राप्रमाणे महागाई भत्ता देणे, अंशदायी पेंशन योजना बंद करून जुनी पेशंन योजना लागू करणे, सुधारीत आकृतीबंधाच्या नावाखाली कर्मचारी कपातीचे धोरण शासन राबवू पाहत आहे. त्यास सर्वच संघटनांनी कडाडून विरोध केला आहे, कंत्राटी कर्मचा-यांच्या नेमणूकाकायम करणे, युनियनच्या मागणीनुसार अनुकंपा भरती पुर्ववत चालू करणे यासह विविध मागण्यांसाठी आज संप पुकारण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन-४३४०, लेखावर्गीय कर्मचारी संघटना, चतुर्थ श्रेणीकर्मचारी संघटना, कृषि कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, वाहन चालक कर्मचारी संघटना, पशुचिकीत्सा व्यवसायी संघटना, ग्रामसेवक संघटना, पर्यवेक्षीका संघटना, शिक्षक संघटना याचबरोबर अहमदनगर जिल्हा पेन्शनर असोसिएशन या अशा अनेक संघटनांना सहभाग नोंदवून आजचा संप १००% यशस्वी केला असल्याचे कर्मचा-यांनी सांगितले.