कृषी उद्योजकता विकासातून रोजगाराच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:57+5:302021-02-13T04:20:57+5:30

‘कृषी व पूरक क्षेत्रात कृषी उद्योजकता व रोजगाराच्या संधी’ याविषयी दोन आठवड्यांचे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या ...

Employment opportunities through agri-entrepreneurship development | कृषी उद्योजकता विकासातून रोजगाराच्या संधी

कृषी उद्योजकता विकासातून रोजगाराच्या संधी

‘कृषी व पूरक क्षेत्रात कृषी उद्योजकता व रोजगाराच्या संधी’ याविषयी दोन आठवड्यांचे ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेच्या सांगता समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. जी. व्यंकटेश्वरलू बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अशोक ढवण होते. याप्रसंगी अशोक फरांदे, शरद गडाख, प्रमोद रसाळ, मिलिंद अहिरे, सुनील गोरंटीवार, बी.बी. ढाकरे, बी.एम. भालेराव, व्ही.एस. पाटील, एम.आर. पाटील उपस्थित होते.

ढवण म्हणाले की, कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. कृषी उद्योजकतेच्या माध्यमातून उत्पादनांचे मूल्यवर्धन करून देशांतर्गत, तसेच परदेशातील बाजारपेठेत अधिक मागणी कशी राहील, याकडे लक्ष द्यायला हवे. कृषी उद्योजकता प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करून योग्य अंमलबजावणीच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे पर्याय उपलब्ध करावेत.

कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कृषी उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असून, स्वयंरोजगारामार्फत स्वत:चा सर्वांगीण विकास करावा.

स्वागत आणि ओळख प्रमोद रसाळ यांनी करून दिली. व्याख्यानमालेचा आढावा मिलिंद अहिरे यांनी सादर केला.

Web Title: Employment opportunities through agri-entrepreneurship development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.