संगमनेर शहरात अतिक्रमण हटाव मोहीम
By | Published: December 5, 2020 04:34 AM2020-12-05T04:34:06+5:302020-12-05T04:34:06+5:30
शहरात अतिक्रमण वाढल्याने तसेच वाहतुकीची समस्या गंभीर बनल्याने अतिक्रमणाने वेढलेले रस्ते मोकळे करण्यात आले. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर अतिक्रमणही वाढते ...
शहरात अतिक्रमण वाढल्याने तसेच वाहतुकीची समस्या गंभीर बनल्याने अतिक्रमणाने वेढलेले रस्ते मोकळे करण्यात आले. शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबर अतिक्रमणही वाढते आहे. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढत ते टॅक्टरमध्ये भरून नेण्यात आले. काही ठिकाणी व्यावसायिक व नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. किरकोळ अपवाद वगळता मोहीम शांततेत पार पडली. मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, अतिक्रमण विभागप्रमुख सुदाम सातपुते, सहायक रचनाकार शुभम देसले, रचना सहायक कुलदीप पाटील यांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. नाशिक-पुणे महामार्गावरील ऑरेंज कॉर्नरपासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले. कारवाईत सातत्य राहणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. बांगर यांनी सांगितले.
------------------
फोटो नेम : ०२ अतिक्रमण
ओळ : जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण काढण्यात आले.
-------
सदर बातमीत कोट घ्यावा, ही विनंती.