जामखेड शहरातील अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 04:14 PM2020-05-10T16:14:13+5:302020-05-10T16:14:41+5:30
जामखेड रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला.
जामखेड : रहदारीला अडथळा ठरणाºया खर्डा चौकातील टप-या राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शनिवारी दुपारी उचलण्यात आल्या. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर या चौकाने मोकळा श्वास घेतला.
याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होणाºया बॅनरबाजीनेही शहराचे विद्रूपीकरण होत असे. तेही आता थांबणार आहे. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने आता वृक्षलागवड केली जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील दोन किलोमीटर परिसर एक महिन्यापासून हॉटस्पॉटमध्ये आहे. रस्ते जरी मोकळे असली तरी या चौकात मोठ्या प्रमाणावर टपºया असल्याने रहदारीला अडथळा येतो. आठवडे बाजारच्या दिवशी दिवसभर वाहतूक ठप्प असते. तसेच हा शहरातील महत्त्वाचा चौक आहे. येथे रहदारी असते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीही केली जाते. यामुळे चौक विद्रूप होतो. यामुळे तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी सुहास जगताप, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शनिवारी दुपारी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. काही टपºया, दुकानांपुढील शेड काढण्यात आले. यामुळे खर्डा चौकाने मोकळा श्वास घेतला. अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी दहा फूट उंच झाडे लावण्याचा उपक्रम नगरपरिषदेने हाती घेतला आहे.