दिव्यांगांमधील ऊर्जा समाजासाठी दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:30 AM2021-02-23T04:30:45+5:302021-02-23T04:30:45+5:30
सुपा : अनेक जण दिव्यांग असूनही त्याचे ओझे मानत नाहीत. त्यांच्यामध्ये जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती व ऊर्जा दिसून येते. दिव्यांगांमध्ये ...
सुपा : अनेक जण दिव्यांग असूनही त्याचे ओझे मानत नाहीत. त्यांच्यामध्ये जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती व ऊर्जा दिसून येते. दिव्यांगांमध्ये असणारी हीच ऊर्जा समाजासाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर तालुक्यातील सुपा येथे दिव्यांग वधू- वर मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अपंग कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सुनील करंजुले व संतोष जाधव व नीलेश लंके प्रतिष्ठान यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते.
नगर जिल्ह्यासह धुळे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापूर, करमाळा, जालना, बुलडाणा, बारामती, जुन्नर, जत येथून जवळपास दीडशे वधू-वर मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते. या मेळाव्यात पन्नास टक्क्यांहून अधिक विवाह जमविण्यात आल्याचे सयोजकांनी सांगितले.
यावेळी पेन्शनर संघटनेचे ज्ञानदेव लंके, नीलेश लंके प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष सुदाम पवार, खजिनदार दादा शिंदे, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिर्के, बाळासाहेब खिलारी, ॲड. राहुल झावरे, गणेश कावरे, विजू औटी, संदीप चौधरी, संदीप मते, दौलतराव गांगड, सुहास मोढवे, बाजीराव कारखिले, भाऊ चौरे, संतोष जाधव, रोहिणी करांडे, किशोर सूर्यवंशी, सचिन पानमंद, सुनीता वाळकेर, अनंत म्हस्के, उज्ज्वला घोडके, सुमन रासकर आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, दिव्यांगांमधून जगण्याची ऊर्जा आम्हाला मिळते. त्यामुळे या दिव्यांगासाठी काही तरी केले पाहिजे. या हेतूने माझ्या पगारातून मतदारसंघातील दिव्यांगाला दर महिन्याला एक मोटारसायकल देण्याचा मानस व्यक्त केला आहे. पुढील काळात दिव्यांगाच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असून, तुम्ही एकटे नाही, मी तुमचा भाऊ म्हणून सदैव बरोबर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
---
२१ नीलेश लंके
सुपा येथे आयोजित दिव्यांग वधू- वर मेळाव्यात बोलताना आमदार नीलेश लंके.