पब्जीच्या वेडातून इंजिनीअरची आत्महत्या; माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा पाठवला मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 04:49 AM2019-07-05T04:49:08+5:302019-07-05T04:49:25+5:30

आयटी इंजिनीअर असलेल्या राहुलने पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

Engineer suicide due to madness; Message sent to no one responsible for my death | पब्जीच्या वेडातून इंजिनीअरची आत्महत्या; माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा पाठवला मेसेज

पब्जीच्या वेडातून इंजिनीअरची आत्महत्या; माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नका असा पाठवला मेसेज

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : टाकळीभान येथील राहुल नानासाहेब पवार (वय २८) या युवकाने राहत्या घरी बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. आयटी इंजिनीअर असलेल्या राहुलने पब्जीच्या खेळातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा तरुण आधुनिक पद्धतीने शेती कसत होता. शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसायही सुरू केला होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राहुल याला ‘पब्जी’ खेळाची आवड होती. त्यातून आलेल्या नैराश्यातूनच त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. आत्महत्येपूर्वी राहुलने त्याचे महुणे बाळासाहेब तुवर यांना, ‘मी जीवनाला कंटाळलो आहे. मला जगण्यात रस नाही. माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. आईची काळजी घ्या’, असा मेसेज पाठवला होता.

मला माफ करा, गुड बाय
गावातील काही मित्रांनाही ‘मला माफ करा़ गुड बाय’, असे मेसेज त्याने टाकले. मात्र, हे सर्व मेसेज मध्यरात्री टाकण्यात आल्याने सकाळपर्यंत ते कोणाच्या पाहण्यात आले नाही. एका होतकरू तरुण अभियंत्याने अशा प्रकारे आपली जीवनयात्रा संपविल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Engineer suicide due to madness; Message sent to no one responsible for my death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.