जिल्ह्यात इंग्रजी माध्यमाच्या सात शाळा बेकायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 06:27 PM2018-05-18T18:27:51+5:302018-05-18T18:27:57+5:30
शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत.
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मनमानीने कळस गाठला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या इंग्राजी माध्यमाच्या सात शाळा शिक्षण विभागाने अनाधिकृत घोषित केल्या आहेत. बेकायदेशीर असलेल्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागने केले आहे.
खासगी शाळा सुरू करताना जिल्हा परिषदेची मान्यता घेणे बंधनकारक असते. शासनाची मानांकने पूर्ण करणाऱ्या शाळांना मान्यता मिळते. शहरासह जिल्ह्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले आहे. जिल्ह्यातील बड्या शैक्षिकणिक संस्थांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. पटसंख्या वाढविण्यासाठी खासगी शाळांमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. यावर कळस असा की शासनाची कुठलीही मान्यता इंग्रजी माध्यमाच्या सात शाळा सर्रास सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. शिक्षण विभागाचा कारभार आॅनलाईन झाल्याने ही बाब समोर आली असून, आशा शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे़. शासनाकडून शहरासह जिल्ह्यातील सात शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली असून, त्यानुसार अनाधिकृत शाळांची यादी घोशित करण्यात आली आहे. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. इयत्ता १ ते ८ वी, या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक तयार होते. अनाधिकृत शाळेतील मुलांचे मात्र असे कोणतेही प्रगती पुस्तक तयार होत नाही. याशिवाय अनाधिकृत शाळेतील मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे प्रवेश घेताना पालकांनी शाळेला मान्यता आहे किंवा नाही, याची खात्री करावी़ प्रवेश घेतल्यानंतर त्याचा उपयोग होणार नाही. मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी पालकांनी ही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
पहिलीच्या वर्गातील पटसंख्या
जिल्ह्यातील सात शाळा बेकायदेशीर आढळून आल्या असून, या शाळांमध्ये ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. पुर्व प्राथमिकनंतर पहिलीचा वर्ग सुरू करण्यासाठी मान्यता घेणे बंधनकारक असताना काही शाळांनी ८ वीपर्यंतचे वर्ग सुरू केले होते.
शहरातील अनाधिकृत शाळा
अल हुद्दा इंग्लिश मेडियम स्कुल (मुकुंदनगर)
अली पब्लिक स्कुल (झेंडीगेट )
आनंद गुरुकुल स्कुल (बोल्हेगाव)
मॉडर्न चिल्ट्रन अकेडमी( मुकुंदनगर)
ग्रामीण भागातील अनाधिकृत शाळा
इंदिरा इंग्लिश मिडीयम स्कुल (संगमनेर )
संस्कार मराठी मिडिय स्कुल (पारनेर)
दि़ बुध्दिीस्ट इंटरनॅशनल स्कुल (संगमनेर)