नव्या वाटा गवसल्याचा आनंद

By Admin | Published: May 31, 2014 11:39 PM2014-05-31T23:39:36+5:302014-06-01T00:23:00+5:30

एस्पायर एज्युकेशन फेअर : विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन; तज्ज्ञांकडून शंकांचे निरसन

Enjoying new revenues | नव्या वाटा गवसल्याचा आनंद

नव्या वाटा गवसल्याचा आनंद

अहमदनगर : ‘लोकमत’ आयोजित पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेश्न प्रस्तुत तीन दिवसीय ‘‘एस्पायर एज्युकेशन फेअर- २०१४’’ उत्स्फूर्त प्रतिसादात सुरू आहे. या प्रदर्शनात लोकमत व विखे फाऊंडेशनने नव्या युगाच्या नव्या वाटा उपलब्ध करून दिल्या. गायकवाड सांस्कृतिक भवन, बिग बाजारसमोर येथे सुरू असलेल्या या प्रदर्शनात शिक्षण संस्थासह जिल्ह्याबाहेरील शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांनी सहभाग घेतला आहे. एकाच छताखाली शैक्षणिक संस्था व त्यांच्याकडून मिळणार्‍या सुविधांची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींनी तसेच त्यांच्या पालकांनी गर्दी केली होती. प्रत्येक स्टॉलला भेटी देऊन आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थी व पालकांचेही प्रमाण अधिक होते. विविध अभ्यासक्रमांचे पत्रके वाटण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला जात आहे. सायन्स, कॉमर्स आणि आर्टपेक्षा वेगळे करिअर करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असून, प्रदर्शनात व्यावसायिक कोर्सेस मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आले आहे. व्यवसायाभिमुख कोर्सेसची माहिती देताना डेमो दिला जात असून, प्रेझेंटेशनद्वारे विविध पैलू समजावून सांगितले जात आहे. कोर्सची माहिती देताना होणारा प्रत्यक्ष संवाद तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्याने करिअरचे दरवाजे खुले झाले आहेत. बारावीचा निकाल जाहीर होण्याकरीता अवघे काही दिवस शिल्लक असून, विद्यार्थ्यांच्या मनात करिअर निवडीविषयी अनेक प्रश्न आहेत. (प्रतिनिधी)आत्मविश्वास हीच गुरूकिल्ली - इंगळेलोकमत एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४ अंतर्गत आयोजित प्रोफेशनल पर्सनॅलीटी डेव्हलपमेंट या सेमिनारमध्ये व्यक्तीमत्त्वाचा विकास करणे अवघड बाब वाटते. आपण दैनंदिन जीवनात जसे वागतो, बोलतो, विचार करतो तसे आपले व्यक्तीमत्त्व घडते. आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. आत्मविश्वास हीच आपल्या यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली असल्याचे प्रतिपादन डॉ.अरुण इंगळे यांनी केले. या सेमिनारमध्ये त्यांनी व्यक्तीमत्त्व, व्यक्तीमत्त्वाचा विकास, नैसर्गिक गुण, उत्तम व्यक्तीमत्त्वासाठी, तुज आहे तुज पाशी, प्रामाणिकपणा, एकाग्रता, आत्मावलोकन, कर्तव्य, भाषेवरील प्रभुत्व, सकारात्मक विचार, स्वयंशिस्त, मितभाषी आदी मुद्यांवर समर्पक मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधाविखे फाऊंडेशनद्वारा संचलित इन्स्टिट्यूट आॅफ बिझनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रूरल डेव्हलपमेंट येथे व्यवस्थापन विषयाशी संबंधित एमबीए, एमसीए हे अभ्यासक्रम शिकविले जातात. तसेच या संस्थेचे कॉलेज आॅफ नर्सिंग, कॉलेज आॅफ फिजीओथेरपी, कॉलेज आॅफ फार्मसी, मेडिकल कॉलेज, कॉलेज आॅफ अ‍ॅग्रीकल्चर, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा देण्यात येतात.

Web Title: Enjoying new revenues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.