प्राथमिक शिक्षकांच्या स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:31+5:302021-03-04T04:38:31+5:30
गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य सरकारच्या शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने ...
गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. राज्य सरकारच्या शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या वतीने शिक्षकांसाठी नवोपक्रमाचे आयोजन केले जाते. त्यात शाळांमध्ये अध्ययन, अध्यापन प्रक्रिया अधिक आनंददायी व सुलभ होण्यासाठी काही रचनात्मक गोष्टी राबविल्या जातात. तालुक्यातील काही शिक्षकांनी यात उल्लेखनीय कामगिरी केली. बेलापूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शैलेजा जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळविला. उंबरगाव येथील शिक्षक शकील बागवान यांनी पाचवे स्थान पटकावले.
शैलजा जाधव यांनी गणित आत्यंतिक सोप्या पद्धतीने कसे सोडवता येईल यासाठीचे शैक्षणिक साहित्य निर्माण केले. शकील बागवान यांनी मुलांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध निर्माण केलेल्या बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्याची जागृती करण्यारा उपक्रम सादर केला. बेलापूर येथील शिक्षिका महेजबीन बागवान यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्याकरिता उर्दूतून व्हिडिओ निर्मिती केली. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेण्यात आली असून, राज्यस्तरीय उत्तेजनार्थ पुरस्कारही त्यांनी पटकावला आहे. गटशिक्षणाधिकारी संजीवनी दिवे यांनी विजेते शिक्षक दाम्पत्य शकील व महेजबीन बागवान यांचा सत्कार केला. शिक्षणविस्तार अधिकारी दुरगुडे, केंद्रप्रमुख मंगल गायकवाड, केंद्र साहाय्यक राजेंद्र पंडित, रमेश वारुळे, सरदार पटेल, महादेव गर्जे, इरफान शेख, राजेंद्र कदम, शाहीन अहमद, आदी उपस्थित होते.
----------