सुवासिनींनी जपले पर्यावरण संवर्धन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:59+5:302021-06-25T04:15:59+5:30
‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणे वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदूषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरीतीने करीत ...
‘वटपौर्णिमा’ हा सण नावाप्रमाणे वटवृक्षाशी निगडीत आहे. वडाचे झाड हे हवा प्रदूषण नियंत्रणाबरोबरच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे कामही उत्तमरीतीने करीत असून, वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे रोपण करण्याचा उपक्रम राबविण्यासाठी आंबी खालसा ग्रामपंचायतचे सरपंच बाळासाहेब ढोले, उपसरपंच रशीद सय्यद, ग्रामसेवक अशोक कडनर, दीपक ढमढेरे, विलास माने, अविनाश भोर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वटवृक्ष उपलब्ध करून दिले. येथील महिलांनी मुळेश्वर मंदिर परिसरात वटवृक्षांचे रोपण केले. अश्विनी भोर व सुयोग भोर या नवदाम्पत्याच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी सदस्या शुभांगी कहाणे, आशा भुजबळ, मंदा कहाणे, सुनंदा कहाणे, शोभा बेलापूरकर, शांताबाई थोरात, कोमल माने, लक्ष्मीबाई घाटकर, उर्मिला कहाणे, शकुंतला कहाणे उपस्थित होत्या.
..................
पर्यावरणाचे रक्षण व संगोपन करण्याचा निश्चय महिलांनी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेच्या निमित्ताने करावा. झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरण रक्षण करू.
– शुभांगी कहाणे, सदस्या, ग्रामपंचायत, आंबी खालसा.