राहुरी ग्रामीण रुग्णालय सुसज्ज करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:41+5:302021-04-04T04:20:41+5:30
राहुरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असूनही नागरी आरोग्य सुविधांबाबत नागरिक वंचित आहेत. एखादा ...
राहुरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. तालुक्याचे ठिकाण असूनही नागरी आरोग्य सुविधांबाबत नागरिक वंचित आहेत. एखादा अपघात झालेल्या रुग्णास गंभीर दुखापत झाल्यास, त्यास कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. केवळ तात्पुरती मलमपट्टी करून नगर येथील दवाखान्यात हलविण्याचा सल्ला दिला जातो. सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोनाचे संकट चालू आहे. सर्व नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. अशा परिस्थितीतही ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णास कोणाताही आजार असो, एकाच प्रकारच्या गोळ्या, औषधे दिली जातात. रुग्णालयात एक्स रे मशीन, एमआरआय मशीन, अद्ययावत पॅथोलॉजिकल लॅब, सोनोग्राफी मशीन आदी मशीन नसल्याकारणाने गरीब रुग्णांना खासगी हॉस्पिटलमधून हजारो रुपये खर्च करावे लागतात, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर राहुल उर्फ पप्पू कल्हापूरे, विजय सिनारे, प्रवीण खेडेकर, सागर जावळे, संकेत मोरे, आशुतोष आढाव, जाॅन्सन बर्डे, कृष्णा तनपूरे, सिद्धार्थ तनपूरे, शहाजी कल्हापूरे, अरबाज शेख, मुजफ्फर शेख, वैभव झावरे, नीलेश बोर्डे, ताराचंद भालेराव, गणेश काळे आदींच्या सह्या आहेत.