अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिवसाआड सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:17+5:302021-04-17T04:19:17+5:30

संगमनेर : शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील औषधांची दुकाने वगळता, अत्यावश्यक सेवेत येणारी सर्व दुकाने एक ...

Essential service shops will be open during the day | अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिवसाआड सुरू राहणार

अत्यावश्यक सेवेतील दुकाने दिवसाआड सुरू राहणार

संगमनेर : शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता शहरातील औषधांची दुकाने वगळता, अत्यावश्यक सेवेत येणारी सर्व दुकाने एक दिवसाआड सुरू ठेवण्यात येणार आहे. व्यापारी बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.सचिन बांगर यांनी केले आहे.

संगमनेर व्यापारी असोसिएशन व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गुरुवारी (दि.१५) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार (दि.१६) पासून शहरातील औषध दुकाने वगळता, अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजीपाला, अन्नपदार्थ, खते, बियाणे व शेतीविषयक साहित्य आदी दुकाने एक दिवसाआड सुरू ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी बांधवांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, राज्यात ‘बेक्र द चेन’च्या माध्यमातून घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते आहे.

------------

दुकाने सुरू ठेवण्याचा वार व दिनांक

शुक्रवार - १६ एप्रिल

रविवार - १८ एप्रिल

मंगळवार - २० एप्रिल

गुरुवार - २२ एप्रिल

शनिवार - २४ एप्रिल

सोमवार - २६ एप्रिल

बुधवार - २८ एप्रिल

शुक्रवार - ३० एप्रिल

--------------------

दुकाने बंद ठेवण्याचा वार व दिनांक

शनिवार - १७ एप्रिल

सोमवार - १९ एप्रिल

बुधवार - २१ एप्रिल

शुक्रवार - २३ एप्रिल

रविवार - २५ एप्रिल

मंगळवार - २७ एप्रिल

गुरुवार - २९ एप्रिल

....

Web Title: Essential service shops will be open during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.