गुंडेगाव येथे शेतकरी कंपनीची स्थापना

By | Published: December 6, 2020 04:21 AM2020-12-06T04:21:07+5:302020-12-06T04:21:07+5:30

केडगाव : बचत गटाच्या माध्यमातून नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे रामेश्वर बचत गट संचलित शुढळेश्वर शेतकरी प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात ...

Establishment of Farmers Company at Gundegaon | गुंडेगाव येथे शेतकरी कंपनीची स्थापना

गुंडेगाव येथे शेतकरी कंपनीची स्थापना

केडगाव : बचत गटाच्या माध्यमातून नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे रामेश्वर बचत गट संचलित शुढळेश्वर शेतकरी प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आली.

ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने विकासाला चालना मिळाली आहे व कंपनीच्या माध्यमातून गुंडेगाव येथील शेतकऱ्यांना खते, बियाणे, कीटकनाशके, औषधे उपलब्ध होणार असून, याचा फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे, असे मत कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी व्यक्त केले. यावेळी कृषी अधिकारी नारायण कारंडे, कृषी सहायक लांडगे उपस्थित होते.

येथे २००२ साली रामेश्वर बचत गटाची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक सदस्याकडून मासिक पाचशे रुपयांची बचत घेऊन वीस वर्षांत चाळीस लाखांचे भागभांडवल जमा झाले. शुढळेश्वर शेतकरी प्रोड्युसर कंपनीची स्थापना संभाजी जाधव, कोडिंबा लिंभोरे, विठ्ठल माने, बाळासाहेब कासार, सिंधू जाधव, सुभाष हराळ, सतीश चौधरी, शहाजी जाधव, शरद हराळ, रतन नाईक, गणेश हराळ, अनिल पवार, विशाल पिंपरकर आदी सदस्यांनी केली.

Web Title: Establishment of Farmers Company at Gundegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.