संगमनेरात वैद्यकीय तज्ज्ञांची बालरोग टास्क फोर्स समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:37+5:302021-06-11T04:14:37+5:30
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशान्वये ही टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष व सचिव यांच्यासह ...
संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशान्वये ही टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात अध्यक्ष व सचिव यांच्यासह दहा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संगमनेर तालुक्यातील बालरोग तज्ज्ञ, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी कर्मचारी यांनी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लहान मुलांवर कोरोना उपचार, आयसीयू व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स नियुक्त करण्यात आली आहे.
-------------
समितीतील पदाधिकारी, सदस्य
डॉ. जयश्री जाधव (अध्यक्ष), डॉ. योगेश निघुते (सचिव), डॉ. ओमप्रकाश सिकची, डॉ. राजेंद्र मालपाणी, डॉ. दिलीप बोरा, डॉ. राजेंद्र खताळ, डॉ. उज्ज्वला जठार, डॉ. बापूसाहेब काकड, डॉ. संदीप होन, डॉ. बहुद्दीन शेख या डॉक्टरांची संगमनेरातील वैद्यकीय तज्ज्ञांची बालरोग टास्क फोर्स समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.