संगमनेरात वैद्यकीय तज्ज्ञांची बालरोग टास्क फोर्स समिती स्थापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:14 AM2021-06-11T04:14:43+5:302021-06-11T04:14:43+5:30
डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, संगमनेर ----------- संभाव्य लाटेतून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासह बाधित झालेल्या लहान मुलांवर ...
डॉ. राजकुमार जऱ्हाड, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, संगमनेर
-----------
संभाव्य लाटेतून लहान मुलांना सुरक्षित ठेवण्यासह बाधित झालेल्या लहान मुलांवर कोठे व कसे उपचार करावेत याचे नियोजन सुरू आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष (सीसीसी) सुरू करण्याबाबतही निर्णय झाला आहे. सध्या सुरू असलेल्या आरोग्य सर्वेक्षणात लहान मुलांच्याही तपासण्या सुरू करण्यात आल्या असून, त्यांची काळजी घेण्याबाबत पालकांना सूचना करण्यात येत आहे. बालरोगतज्ज्ञांच्या टास्क फोर्सकडून येणार्या प्रत्येक सूचनेची अंमलबजावणी केली जाणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर