साईनगरीत पतसंस्थांसाठी प्रशिक्षण व संशोधन मंदिराची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:41 PM2017-09-20T18:41:16+5:302017-09-20T18:41:16+5:30
राज्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ सक्षमीकरणाबाबत संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिर्डीत प्रशिक्षण व संशोधन मंदिराची कायमस्वरूपी उभारणी करण्यात आली आहे़
शिर्डी : राज्यातील पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यासाठी तसेच पतसंस्था चळवळ सक्षमीकरणाबाबत संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीच्या वतीने शिर्डीत प्रशिक्षण व संशोधन मंदिराची कायमस्वरूपी उभारणी करण्यात आली आहे़.
या वास्तूचा उद्घाटन समारंभ शनिवार २३ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे व बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली़
या वातानुकूलित इमारतीत १६० प्रतिनिधींची निवासाची व्यवस्था होईल. एकाच वेळी एक हजार प्रतिनिधी प्रशिक्षण घेऊ शकतील़ पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या डिपॉझिट गॅरंटी कार्पोरशनचे कामकाज काही कारणांमुळे बंद करावे लागले आहे़ परंतु या संस्थेला झालेल्या नफ्यातून व बुलढाणा अर्बनच्या सहकार्याने या प्रशिक्षण व संशोधन केंद्राची उभारणी झाल्याचे कोयटे म्हणाले.
या केंद्रामार्फत तीन महिन्यांच्या संशोधनातून पतसंस्थांसाठी एनीवेअर बँकीग, क्रेडिट स्कोअर व आय़ एम़ पी़ एस़ या अत्याधुनिक तंत्र प्रणालीचे संशोधन पूर्ण केले आहे.