संगमनेरात विविध समाज समन्वय समितीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:21 AM2021-05-26T04:21:27+5:302021-05-26T04:21:27+5:30
कारभारी देव्हारे (ज्येष्ठ मार्गदर्शक), किरण नेहूलकर (सचिव), विलास राऊत (सहसचिव), अमित पाटणकर (खजिनदार), नितेश शहाणे (समन्वयक), भारत रेघाटे (प्रसिद्धिप्रमुख), ...
कारभारी देव्हारे (ज्येष्ठ मार्गदर्शक), किरण नेहूलकर (सचिव), विलास राऊत (सहसचिव), अमित पाटणकर (खजिनदार), नितेश शहाणे (समन्वयक), भारत रेघाटे (प्रसिद्धिप्रमुख), प्रतीक जाजू, प्रदीप जाधव (आरोग्य विभाग) तर सदस्य म्हणून दीपक कतारी, राम भालेराव, गोविंद गोसावी, आसिफ शेख, राजू खरात, अमोल मस्कुले, प्रशांत यादव, बंटी यादव, विजय आढाव आदींची निवड करण्यात आली आहे.
समितीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न शासन दरबारी मांडणे, सामाजिक उपक्रम राबविणे, सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठविणे, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणे, राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेणे, विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करणे व विविध समाजांत समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मदत करणे आदी विषयांवर विविध समाज समन्वय समिती कार्यरत राहणार आहे.