जनता महाविद्यालयाचे नॅककडून मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:22 AM2021-08-29T04:22:13+5:302021-08-29T04:22:13+5:30
समितीचे अध्यक्ष डॉ. सितीकांथा मिश्रा होते, तर समितीत डॉ. प्रवीण सिंग बिष्ट, डॉ. स्वेबर्ट डिसिल्वा यांचा समावेश होता. समितीचे ...
समितीचे अध्यक्ष डॉ. सितीकांथा मिश्रा होते, तर समितीत डॉ. प्रवीण सिंग बिष्ट, डॉ. स्वेबर्ट डिसिल्वा यांचा समावेश होता. समितीचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाबर आणि समन्वयक प्रा. रविराज सुपेकर यांनी समिती सदस्यांचे स्वागत केले. दोन दिवसांत नॅक समितीने महाविद्यालयाशी संबंधित शिक्षक, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, आदी घटकांबरोबर संवाद साधला. महाविद्यालयाविषयी त्यांच्या अपेक्षा व मते जाणून घेतली. त्याचबरोबर महाविद्यालयात आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, तांत्रिक सुविधा, इंटरनेट सुविधा यासारख्या अत्यंत सूक्ष्म बाबींची शहानिशा करून महाविद्यालयाचे मूल्याकन केले. या दोन दिवसांतील महाविद्यालयाचे निरीक्षण, परीक्षण करून केलेला गोपनीय अहवाल बंगलोर येथील राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेस सादर केला. त्यानुसार लवकरच महाविद्यालयाच्या गुणवत्तेविषयी प्राप्त गुणांकनानुसार श्रेणी मिळणार आहे.
280821\dsc_0377.jpg
रुई छतिसी : येथील जनता कला व विज्ञान महाविधालयात नैक समिती चे अध्यक्ष डॉ. सितीकांथा मिश्रा यांचे पुष्पगुच्छा देऊन स्वागत करतांना प्राचार्य डॉ सुरेश बाबर (छायाचित्र : संजय ठोंबरे )