कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान

By Admin | Published: April 18, 2017 05:47 PM2017-04-18T17:47:47+5:302017-04-18T17:47:47+5:30

येथील काळाराम मंदिरामागे राहणाºया सुरज सत्यनारायण सोमानी या ३२ वर्षीय तरूणास कोब्रा जातीचा नाग चावल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याला जीवदान मिळाले.

Even after cobra basting him alive | कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान

कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान

रीरामपूर : येथील काळाराम मंदिरामागे राहणाºया सुरज सत्यनारायण सोमानी या ३२ वर्षीय तरूणास कोब्रा जातीचा नाग चावल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याला जीवदान मिळाले. ‘काळ आला होता, पण वेळ आली नाही’ याची प्रचितीच त्याने यानिमित्ताने घेतली.रविवारी रात्री ३ च्या सुमारास कोब्रा जातीच्या नागाने त्याला चावा घेतला. त्यास तत्काळ स्थानिक कामगार रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन औषधोपचार केल्यामुळे त्यास जीवदान मिळाले. रात्री झोपेत पायास काहीतरी चावले. प्रारंभी उंदीर किंवा घुस चावल्याचे वाटून त्याने दुर्लक्ष केले. मात्र नंतर त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता कपाटाखाली सुमारे सहा फुटांचा काळ्या रंगाचा कोब्रा जातीचा नाग दिसला. कुटुंबीयांनी सर्पमित्र फरदीन शेख यास बोलावून सूरज यास तत्काळ कामगार रूग्णालयात दाखल केले. डॉ. विनायक मोरगे, डॉ. रवींद्र जगधने यांनी तत्काळ उपचार सुरू केले.

Web Title: Even after cobra basting him alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.