निवेदन देऊनही ग्रामसभा घेतली नाही, ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 12:44 PM2022-12-26T12:44:48+5:302022-12-26T12:45:58+5:30
भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय जवळ सुरुवात झाली. ज
मधु ओझा
पुणतांबा ( जि. अहमदनगर ) : जलस्वराज्य टप्पा दोन या योजनेतील त्रुटी, आर्थिक भ्रष्टाचार, तसेच योजना हस्तांतर करू नये यासाठी ग्रामसभा घेण्याचे निवेदन देऊनही ग्रामसभा घेतली नाही याचा जाब विचारण्यासाठी आज ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
भारतीय जनता पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला पुणतांबा ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय जवळ सुरुवात झाली. जलस्वराज्य टप्पा दोन या पूरक पाणीपुरवठा योजनेच्या कामातील त्रुटी, आर्थिक भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी तसेच ही योजना हस्तांतर करू नये यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्याची मागणी करणारे निवेदन देऊनही ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी दखल घेतल नसल्याने आज भारतीय जनता पार्टी चे अहमदनगर उत्तर जिल्हा सरचिटणीस सुभाष वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली.
या आंदोलनात सुभाष जाधव,साहेबराव बनकर,गणेश बनकर, विठ्ठलराव जाधव,प्रतापराव वहाडणे,सर्जेराव जाधव,अण्णासाहेब डोखे,चंद्रकांत वाटेकर, डॉ.चव्हाण यांच्या सह भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित आहेत.