आणखी चांगला दिलासा.....दहा रुग्णांना घरी सोडले, घरी जाणारे दोनशेच्या जवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:40 PM2020-06-13T12:40:39+5:302020-06-13T12:40:53+5:30

अहमदनगर- एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरी दिलासादायक बाब म्हणजे रोज १० ते १२ रुग्ण बरे झाल्याने घरी जात आहेत. चांगला उपचार, रुग्णांची देखभाल आणि रुग्णांचे मनोबळ यामुळे कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी आणखी दहा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन, डॉक्टरांमध्ये समाधान आहे.

Even better consolation ..... ten patients left at home, about two hundred going home | आणखी चांगला दिलासा.....दहा रुग्णांना घरी सोडले, घरी जाणारे दोनशेच्या जवळ

आणखी चांगला दिलासा.....दहा रुग्णांना घरी सोडले, घरी जाणारे दोनशेच्या जवळ

अहमदनगर- एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरी दिलासादायक बाब म्हणजे रोज १० ते १२ रुग्ण बरे झाल्याने घरी जात आहेत. चांगला उपचार, रुग्णांची देखभाल आणि रुग्णांचे मनोबळ यामुळे कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी सकाळी आणखी दहा रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासन, डॉक्टरांमध्ये समाधान आहे.
शनिवारी दहा जणांना घरी सोडण्यात आले. डॉक्टर, नर्सेस यांनी त्यांना निरोप दिला. टाळ््या वाजवून त्यांचे स्वागत केले. या दहांमध्ये अहमदनगर शहरातील तीन, शेवगावमधील दोन, संगमनेर तालुक्यातील दोन, राहाता तालुक्यातील एक, पाथर्डी तालुक्यातील दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या  १९६ झाली आहे. म्हणजे आता फक्त ३९ जणांवरच उपचार सुरू आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. शुक्रवारी १९ व्यक्तींना घरी सोडण्यात आले होते. त्यामुळे कोरोना रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण चांगले असल्याचे दिसते आहे.
 
Web Title: Even better consolation ..... ten patients left at home, about two hundred going home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.