उद्योग बंद तरीही जावईबापूंची कमाई जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 12:51 PM2020-05-14T12:51:35+5:302020-05-14T13:34:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या भितीने अहमदनगर एमआयडीसीसह जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे चाक रुतले आहे़ मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे जावई असलेले आमदार अशुतोष काळे हे सध्या सॅनिटायझरचे जोरात मार्केटींग करत आहेत़ त्यांनी नागापूरसह इतर एमआयडीसीतील कारखान्यांना सॅनिटायझरची विक्री करत लाखोंची कमाई सुरू केली आहे़ त्यामुळे जावईबापूंच्या सॅनिटायझरची चर्चा सध्या कोपरगाव आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यात आहे़.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या भितीने अहमदनगर एमआयडीसीसह जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे चाक रुतले आहे़. मात्र राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे जावई असलेले आमदार अशुतोष काळे हे सध्या सॅनिटायझरचे जोरात मार्केटींग करत आहेत़. त्यांनी नागापूरसह इतर एमआयडीसीतील कारखान्यांना सॅनिटायझरची विक्री करत लाखोंची कमाई सुरू केली आहे़. त्यामुळे जावईबापूंच्या सॅनिटायझरची चर्चा सध्या कोपरगाव आणि शेवगाव या दोन्ही तालुक्यात आहे़.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सॅनिटायझरचा वापर अचानक वाढला आहे़ कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले़ हे लॉकडाऊन दीड महिन्यांपासून सुरू आहे़. त्यामुळे सर्वच कारखाने बंद आहेत़ परंतु, राष्ट्रवादीचे कोपरगावचे आमदार अशुतोष काळे यांनी कोरोनातही संधी शोधली़ सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली़. अत्यावश्यक सेवा असल्याने त्यांना परवानगीही वेळेत मिळाली़. त्यामुळे कोपरगावचे सॅनिटायझर एकदम जोरात आहेत़. त्यात काळे यांच्या सासूबाई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़. सासूबार्इंना मानणारेही अनेकजण असल्याने त्यांची सॅनिटायझर विक्रीसाठी जावईबापूंना अप्रत्यक्षरित्या मदतच झाली़. याशिवाय काळे यांचे सासरे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांचे पती माजी आमदार चंद्रशेखर (भाऊ) यांचे जिल्ह्यात वलय आहे़. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे़. तसेच त्यांच्याकडे एक कारखाना आणि शिक्षणसंस्था आहेत़. त्यामुळे त्यांना जावईबापूंच्या सॅनिटायझरची गरज पडणारच आहे़. त्यामुळे जावईबापूंचे साईनटायझर सध्या जोरात असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे़.