संगमनेरात सायंकाळी राहुल गांधी यांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:43 IST2019-04-26T16:13:03+5:302019-04-26T16:43:07+5:30
कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच सभा शुक्रवारी (२६ एप्रिल) संगमनेरात होत आहे.

संगमनेरात सायंकाळी राहुल गांधी यांची सभा
संगमनेर : कॉँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांची अहमदनगर जिल्ह्यातील पहिलीच सभा शुक्रवारी (२६ एप्रिल) संगमनेरात होत आहे. संगमनेरातील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या सभेसाठी कॉँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
संध्याकाळी पाच वाजता होणाºया या सभेच्या वेळेत बदल करण्यात आला असून संध्याकाळी सात वाजता सभा सुरू होणार असल्याची माहिती संगमनेर तालुका व शहर कॉँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ खासदार राहुल गांधी सभा होत आहे. कॉँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते प्रथमच जाहिरसभेच्या निमित्ताने नगर जिल्ह्यात येत आहेत.
संगमनेरात सभा होत असून यावेळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. २०० अधिकारी, २५०० पोलीस, केंद्रीय सुरक्षा पथक, श्वान पथक, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले आहे.