घरोघर जाऊन प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:35+5:302021-05-06T04:21:35+5:30
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. सध्याची लसीकरण केंद्रांची परिस्थिती लक्षात घेता ...
केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. सध्याची लसीकरण केंद्रांची परिस्थिती लक्षात घेता लसीकरण केंद्रांवर अतिरिक्त ताण पडून लसीकरणावेळी मोठा गोंधळ उडण्याची, गर्दी होण्याची शक्यता आहे. शहर व ग्रामीण भागात घरोघर जाऊन प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करावे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल. तसेच ज्यांना केंद्रापर्यंत जाऊन लस घेणे शक्य नाही त्यांना देखील लस घेणे सोयीस्कर होईल.
निवेदनावर भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिनेश सोमाणी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, ओबीसी आघाडी जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, जिल्हा वरिष्ठ नागरिक सेल प्रमुख शिवाजीराव लष्करे, जिल्हा अल्पसंख्याक आघाडी प्रमुख आसिफ पठाण, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष रेश्मा खांडरे आदींची नावे आहेत.