कोरोनाबाधितांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:24+5:302021-05-25T04:24:24+5:30

तिसगाव : कोरोनाच्या सावटात रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची उपासमारही होऊ नये यासाठीही ...

Every effort is made to help the families of the victims | कोरोनाबाधितांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न

कोरोनाबाधितांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न

तिसगाव : कोरोनाच्या सावटात रुग्णांना उपचार मिळणे गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची उपासमारही होऊ नये यासाठीही मायंबा देवस्थान सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.

सावरगाव येथे वंचित कुटुंबांना देवस्थानच्या वतीने किराणा व आरोग्यपूरक साहित्यांचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, अभ्युदय बँक अधिकारी विकास म्हस्के, स्वामी विजयानंद, ज्ञानेश्वर गायखे आदी हजर होते. धस म्हणाले, गर्भगिरीतील रुग्णांच्या अडचणी लक्षात घेऊन महागड्या तपासण्या देवस्थानच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. ११ ठिकाणी कोविड सेंटर सुरू केले आहेत. देवस्थानच्या कोविड सेंटर येथे सकस आहार व रात्रीचे गावरान गायीचे दूध, हळद टाकून रुग्णांना दिले जात आहे. येथून आतापर्यंत चाळीस रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्याचे धस यांनी सांगितले.

यावेळी मच्छिंद्र म्हस्के, अनिल म्हस्के, कैलास चंदनशिव, म्हातारदेव म्हस्के, दत्तात्रय म्हस्के, गणेश म्हस्के आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ज्ञानेश्वर बांदल यांनी आभार मानले.

---

२४ सावरगाव

सावरगाव येथे गरजूंना किराणा वाटप करण्यात आले.

Web Title: Every effort is made to help the families of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.