प्रत्येक गावात ‘घुलेवाडी मॉडेल’चे अनुकरण व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:19 AM2021-05-10T04:19:58+5:302021-05-10T04:19:58+5:30
महसूलमंत्री थोरात हे शनिवारी (दि. ८) संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथील कोविड हेल्थ ...
महसूलमंत्री थोरात हे शनिवारी (दि. ८) संगमनेर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथील कोविड हेल्थ केअर सेंटरला भेटी दिल्या. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेथील ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, आर. बी. राहणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, ॲड. सुहास आहेर, सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके आदी उपस्थित होते.
कोरोना हे आपल्या सर्वांवरील संकट आहे. यामध्ये कोणीही निष्काळजीपणा करू नका. ग्रामीण भागात डॉक्टर, अंगणवाडी, आशा, आरोग्य सेविका, तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व शिक्षक हे अत्यंत चांगले काम करत आहेत. त्यांना सहकार्य करावे. संगमनेरातील प्रशासन व यशोधन कार्यालय आपल्या सेवेसाठी २४ तास कार्यरत आहे, असेही महसूलमंत्री थोरात म्हणाले.