कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांना विम्याचे संरक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:21 AM2021-05-13T04:21:24+5:302021-05-13T04:21:24+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आमदार डॉ. तांबे यांनी बुधवारी ...

Everyone on duty should be covered by insurance | कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांना विम्याचे संरक्षण मिळावे

कर्तव्य बजावणाऱ्या सर्वांना विम्याचे संरक्षण मिळावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना आमदार डॉ. तांबे यांनी बुधवारी (दि.१५) पत्र पाठवून ही मागणी केली. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडी सरकार अत्यंत प्रभावी योजना राबवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करत आहे. आरोग्य, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी त्याचप्रमाणे विनाअनुदानित कर्मचारी, कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी हेदेखील कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यातील अनेकांना मृत्यू आला असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. माणुसकीच्या भूमिकेतून महाराष्ट्र सरकारने सदर कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी, फॅमिली पेन्शन तात्काळ सुरू करावी, तसेच जे कर्मचारी पेन्शन नियमात बसत नाहीत अशांना डीसीपीएस व एनपीएस सानुग्रह अनुदान मंजूर करावे. सदर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियमानुसार अनुकंपातत्त्वावर नोकरीत विशेष बाब म्हणून तातडीने सामावून घ्यावे, आदी मागण्या आमदार डॉ. तांबे यांनी पत्राद्वारे केल्या आहेत.

Web Title: Everyone on duty should be covered by insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.