प्रत्येकाने कुटुंबाची काळजी घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:15 AM2021-06-28T04:15:43+5:302021-06-28T04:15:43+5:30
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २७) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार ...
अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेत शनिवारी (दि. २७) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पंचायत समिती सभापती सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ आरगडे, जिल्हा परिषद सभापती मीरा शेटे, सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे, सीताराम राऊत, विष्णुपंत रहाटळ, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार जऱ्हाड, बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्स समितीच्या अध्यक्षा डॉ. जयश्री जाधव, डॉ. योगेश निघुते, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत संगमनेर तालुक्यात प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले आहे. स्थानिक प्रशासनाने ताबडतोब शोधमोहीम सुरू करून तपासणी व त्यावर ट्रीटमेंट सुरू करावी. या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हाच कोरोना वाढ रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय आहे. याबाबत कोणीही निष्काळजीपणा करू नका.