निवडणुका बिनविरोध करण्यात सर्वांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:40+5:302021-02-23T04:31:40+5:30
भेंडा : निवडणुका कोणत्याही असोत. बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली, तरच निवडणुका बिनविरोध पार पडतात, असे मत मारुतराव घुले ...
भेंडा : निवडणुका कोणत्याही असोत. बिनविरोध करण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शवली, तरच निवडणुका बिनविरोध पार पडतात, असे मत मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांनी व्यक्त केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक येथे नागेबाबा परिवाराच्यावतीने नागेबाबा भक्त निवासात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर ‘ज्ञानेश्वर’चे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, संचालक काकासाहेब शिंदे, नागेबाबा पतसंस्थेचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, दत्तात्रय काळे, रावसाहेब कांगुणे, अंकुश महाराज कादे आदी उपस्थित होते.
यावेळी ज्ञानेश्वर कारखाना व भेंडा बुद्रूक ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला, तसेच फुलारी वस्ती ते साबळे वस्ती रस्ता खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी विठ्ठल अभंग, रत्नमाला नवले, लता मिसाळ, भेंडा बुद्रूकच्या सरपंच वैशाली शिंदे, उपसरपंच दादासाहेब गजरे, कुकाण्याच्या सरपंच लताबाई अभंग, अशोक मिसाळ, गणेश गव्हाणे, अशोक वायकर,नामदेव शिंदे यांचेसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
डॉ. शिवाजी शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सविता नवले यांनी सूत्रसंचालन केले. संजय मनवेलिकर यांनी आभार मानले.