वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी माजी सैनिकांची निदर्शने
By साहेबराव नरसाळे | Published: April 3, 2023 04:56 PM2023-04-03T16:56:56+5:302023-04-03T16:57:32+5:30
अहमदनगर : केंद्र सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली. परंतु त्यामध्ये अनेक विसंगती, त्रुटी आहेत. या त्रुटी दूर ...
अहमदनगर : केंद्र सरकारने वन रँक वन पेन्शन लागू केली. परंतु त्यामध्ये अनेक विसंगती, त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करून सैनिकांना वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
नवी दिल्ली येथे जंतर-मंतर मैदानावर देशातील सर्व माजी सैनिक संघटनाच्या माध्यमातून सोमवारी सकाळी आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व वन रँक वन पेन्शनचा योग्य मोबदला मिळण्यासाठी जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर माजी सैनिकांनी सोमवारी आंदोलन केले. तालुकास्तरावर तहसीलदारांना व जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारचे माजी सैनिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ५०० पेक्षा अधिक माजी सैनिक जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात सहभागी झाले होते, अशी माहिती जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी सांगितले.