आता निवृत्त अधिकाऱ्याकडून होणार उत्तरपत्रिकांची तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 01:17 AM2020-01-26T01:17:13+5:302020-01-26T01:17:33+5:30
जिल्हा बँकेच्या भरतीत उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा संशय सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनेच व्यक्त केला होता.
- सुधीर लंके
अहमदनगर : फॉरेन्सिक तज्ज्ञांनी जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी करुन आपला अहवाल दिला आहे. या अहवालाच्या आधारे सहकार विभागाने भरतीला ‘क्लिन चिट’ दिली आहे. मात्र शासकीय संस्थेऐवजी सेवानिवृत्त अधिकाºयाकडून ही फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा बँकेच्या भरतीत उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार झाल्याचा संशय सहकार विभागाने राम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनेच व्यक्त केला होता. मात्र, सहकार विभागाने दिगंबर हौसारे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या फेरचौकशी समितीने उत्तरपत्रिकांची तपासणी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे किंवा फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून करावी लागेल, असा निर्णय घेतला. वैज्ञानिक प्रयोगशाळा मुंबई यांचेकडून मुदतीत पत्र प्राप्त झाले नाही, असे कारण देत चौकशी अधिकाऱ्यांनी या प्रयोगशाळेकडे पाठविल्या नाहीत.
सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी सीआयडीचे सेवानिवृत्त दस्तावेज तपासणी अधिकारी जयंत आहेर यांचेकडे हे काम द्यावे असा आदेश काढला. अहेर यांनी जो अहवाल दिला त्याचा आधार घेत दिगंबर हौसारे यांच्या समितीने सर्व भरती प्रक्रियेला ‘क्लिन चीट’ दिली.