दहावी परीक्षा : हात धुवूनच केला विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 01:21 PM2020-03-21T13:21:28+5:302020-03-21T13:22:24+5:30
राज्य मंडळाच्या आदेशान्वये, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर येणाºया प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दाखल होण्यापूर्वी हँड वॉश उपलब्ध दिले आहे. विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुवूनच परीक्षेसाठी वर्गात प्रवेश दिला.
शेवगाव : राज्य मंडळाच्या आदेशान्वये, पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी रामनाथ कराड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर येणाºया प्रत्येक दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात दाखल होण्यापूर्वी हँड वॉश उपलब्ध दिले आहे. विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुवूनच परीक्षेसाठी वर्गात प्रवेश दिला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाच्या (पुणे) वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सध्या परीक्षा सुरु आहेत. त्यानुसार शनिवार (दि.२१) सकाळी ११ वाजता इतिहास व नागरिक शास्र या विषयाच्या पेपरला सुरवात झाली. तालुक्यातील ८ केंद्र व २ उपकेंद्रात ४ हजार ७७५ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यासाठी ३२५ पर्यवेक्षक, सुमारे २०० इतर कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आलेली आहे. शनिवारी सकाळी पेपर सुरू होण्यापूर्वी राज्य मंडळाच्या आदेशानुसार परीक्षार्थींना तालुक्यातील सर्व केंद्रात प्रवेश देताना स्वच्छ हात धुवूनच आता प्रवेश देण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हँड वॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून दिले होते. हात स्वच्छ धुऊन मुलांनी वर्गात प्रवेश केला.